शनिवार दि.०५ /०८/२०२३ रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी PMPML वाहतूक व्यवस्थापक , स्वारगेट बस डेपो यांना लेखी निवेदन दिले आहे .
आपल्या लेखी निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे की , १ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सेवेचे लोकार्पन झाले . या मेट्रो सेवेचा नागरिक जास्तीत जास्त प्रमाणात कसा वापर करतील अश्या पर्यायांचा विचार करणे अत्यावश्यक आहे .
प्रभाग क्र.२८ मध्ये साधारण ६०,००० ते ७०,००० हजार नागरीवस्ती असून दिवसेंदिवस त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नोकरदार वर्ग,शालेय विद्यार्थी,कॉलेजला जाणारा तरुण वर्ग तसेच महिला व जेष्ठ नागरिक हे दैनंदिन कामकाजासाठी पुणे शहरात ये-जा करीत असतात आणि प्रभागातून मेट्रो स्टेशनचे अंतर लांब अंतरावर आहे आणि पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नागरिकांची या मेट्रो सेवेचा लाभ घेण्याची प्रबळ इच्छा आणि उत्साह आहे. अश्या परिस्थितीत नागरिकांना जर मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील बरेचशे स्थानिक रहिवासी या मेट्रो सेवेचा नक्कीच वापर करतील आणि याचा फायदा मेट्रो रेल्वेला त्याचे उत्पन्न वाढण्यास सुद्धा होईल असा विश्वास श्री शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला . पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी जसे PMPML मार्फत मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी जी फिडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे तसेच फिडर बस सेवा जर प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर- रहाटणी मधून सुरू केली तर नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचणे सोयीचे होईल.
म्हणून नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथून परिसरातील नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी PMPML मार्फत फिडर बस सेवा सुरू करण्यात यावी या आशयाचे लेखी निवेदन PMPML वाहतूक व्यवस्थापक यांना दिले आहे .