पिंपरी चिंचवड, शबनम न्यूज , प्रतिनिधी :
15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त महिला उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पिंपरी मेट्रो स्टेशन येथे दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे महिला उद्योगाचे स्टॉल आणि प्रदर्शन भरविण्यात येणार असून शहरातील लघुउद्योग घरगुती उद्योग करणाऱ्या महिला व्यवसायिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे केले .
Advertisement
नुकतेच पुणे मेट्रो ही सेवा चालू झाली असल्याने अनेक प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहे ही संधी साधून महिलांना आपल्या उद्योगांमध्ये प्रगती करण्याची संधी दुर्गा ब्रिगेडतर्फे देण्यात आली असून उद्योजक महिलांनी महिला बचत गटांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष दुर्गा भोर यांनी केले आहे.
Advertisement