पिंपरी चिंचवड शबनम न्यूज प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे येथील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुनावळेकर रहिवाशींच्या वतीने करण्यात आली आहे . सदर मागणीचे निवेदन चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनीताई जगताप यांच्याकडे देण्यात आले आहे.
भाजप नेते नवनाथ ढवळे , शिवसेना नेते बाळासाहेब दर्शले ,यांच्या सह राहुल काटे ,शुभम भुजबळ तसेच या परिसरातील सोसायटीचे धारक सदस्यांनी हे मागणीची निवेदन दिले आहे.
या निवेदनाद्वारे या पुनावळे करांनी सांगितले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या पुनावळ गावातील सर्वे नंबर 23 मधील खाजगी जमीन तसेच सर्वे नंबर 24 मध्ये महाराष्ट्र शासन वन विभागाची 22.80 हेक्टर जमीन आहे या संपूर्ण जमिनीवर महानगरपालिकेच्या वतीने 2005 मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी आरक्षण टाकण्यात आले संबंधित विभागाकडून जमीन हस्तांतर प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकतो पिंपरी चिंचवड शहर हे भारताच्या नकाशावर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. पुनावळे गाव हे याच स्मार्ट सिटी चा भाग असून सन 2005 ते 2023 दरम्यान पुनावळे गाव अतिशय वेगाने विकसित झाले आहे हे एक शहर बनले आहे याची जागतिक दर्जाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर व आयटी हाफ चे काम पूर्णत्वास आले आहे तसेच या भागात जवळपास शंभर ते दीडशे गगनचुंबी गृह प्रकल्प निर्माण झाले असून त्यामध्ये वीस ते पंचवीस हजार सदनिका तयार झाल्या असून देशातील अनेक शहरातील एक ते दीड लाख नागरिक यामध्ये वास्तव्या करत आहेत परिसरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संकुले निर्माण झाली असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जवळच पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा ब्रिटिश कालीन बंधारा पुनावळे येथे आहे काही अंतरावर राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे तसेच संबंधित जमिनीवर सध्या हजारो मोठे मोठे वृक्ष आहेत ही सर्व गांभीर्याने विचार केल्यास संबंधित जागेवर कचरा डेपो झाल्यास लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न व शालेय विद्यार्थी आरोग्य प्रश्न युवकांचे नोकरीचा प्रश्न जेष्ठ नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याचा प्रश्न वृक्षतोड झाल्याने पर्यावरण दूषित होण्याचा प्रश्न आणि वाहतुकीचे प्रश्न असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतात या विविध समस्या लक्षात घेता पुनावळे ग्रामस्थ व परिसरातील हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी यांचे कुटुंबीय व लहान मुले मुली आजी आजोबा या सर्वांना या समस्यांना सामोरे जावे लागत नाही परिणामी नागरिक पुनावळे सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत तरी आम्ही पुनावळे करांच्या वतीने कळकळीची विनंती करण्यात येते की प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा कायमचा रद्द करावा अशा मागणीची निवेदन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्याकडे पुनावळे करांनी दिले आहे.