शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : आज आपल्या देशाचा स्वतंत्रदिवस मोठ्या आनंदात संपूर्ण देशात साजरा होत आहे आपल्या शहरातील कै.नारायणराव चोंधे शिक्षण संस्थेच्या विद्या विनय निकेतन विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष शंकर गावडे, झोन चेअरपर्सन शिरीष हिवळे,सेक्रेटरी महेंद्र परमार, ट्रेजरर रामचंद्र माने, सदस्य अनुपजी ठाकूर,भरत इंगवले,गुलशन पाल, नितीन काटे, सुदेश भोकरे, विनोद झुनझुनवाला, नागेंद्र शेरेकर, प्रमुख पाहुणे प्रा. ए.पी. सिन्हा, प्रभाग क्र. २६च्या मा. नगरसेविका आरतीताई चोंधे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर संकेत सुरेश चोंधे, चिंचवड किवळे मंडल महिला विभाग उपाध्यक्षा अलकाताई मकवाना, सुवर्णा गाडे, मनिषा कुऱ्हाडे, शोभा कांबळे,कामिनी जाधव, सेवा निवृत्त शिक्षक शांताराम नेरकर, अर्जुनराव पटेल, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक, पुरुषोत्तम दोमकुंडवार, माजी सैनिक फिरांगोजी(तात्या) कामठे, एकनाथ महाजन, सुभाषराव पाठक, बबनराव गिलबिले, उदय मोघे, श्रीकृष्ण गोळे, प्रमोद पानट, रमाकांत मगरे, अभय धर्म उपस्थित होते. प्रा. ए.पी. सिन्हा व अभय धर्म यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व प्रा. ए.पी. सिन्हा, प्रभाग क्र. २६च्या मा. नगरसेविका आरतीताई चोंधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर माध्यमिक व इंग्रजी माध्यमांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.