शबनम न्यूज , प्रतिनिधी :
15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पाडला , यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल च्या डॉ. स्मिता पॅटरसन- मुख्याध्यापिका जास्मिन खरे उप मुख्याध्यापिका पोदार इंटरनॅशनल स्कूल पिंपरी, नुपूर झोपे मेट्रो स्टेशन असिस्टंट मॅनेजर ,वर्षा डहाके संत तुकाराम नगर डेपो मॅनेजर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला तसेच देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे विद्यार्थ्यांचा अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते प्रशस्वी पत्रक देऊन गुणगौरव करण्यात आला 6०० सहाशे विद्यार्थ्यांसह तुकाराम नगर ते सिविल कोर्ट मेट्रो सफर घेण्यात आली तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी विविध फलक हातामध्ये घेऊन स्वच्छता वाहतूक नियमांचे पालन अशा अनेक प्रकारच्या फलक आणि घोषणा देत जनजागृती देखील करण्यात आली यावेळी मुलांना मेट्रो विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली यामध्ये मुलांनी विविध पोशाख घालून फॅशन शो केला आणि मेट्रोचा खूप चांगला अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका तसेच संत तुकाराम नगर एसटी स्थानकाच्या स्थानक प्रमुख मेट्रो स्टेशनच्या स्थानक प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी पालक उपस्थित होते