शबनम न्यूज | प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव, आळंदी जि. पुणे. या ठिकाणी बी.बी.ए. (सी.ए.) विभागाच्या वतीने प्रेरण कार्यक्रम -आरंभ-2023-24 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व प्रा. प्रेरणा पाटील यांच्या गणेश वंदनाने झाली . तसेच पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक करतांना बी.बी.ए.(सी ए ) विभागाचे प्रमुख प्रा.शाहुराज येवते यांनी प्रेरण कार्यक्रम घेण्यामागची भूमिका, उद्देश आणि हेतू सविस्तर मांडून या विभागातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत या संदर्भात विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. हरीश जनार्दन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी करियरकडे मार्गक्रमण करतांना आत्मविश्वास अंगीकारण्याची आवश्यकता विशद करून कोणतेही काम करताना संयम, सहनशीलता,विचार मंथन आणि संवाद कसा महत्त्वाचा आहे या संदर्भात भाष्य केले. ‘छनी हातोड्याचा घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ‘ या म्हणीचा संदर्भ देऊन कठीण काळात प्रयत्न केल्यास चांगले दिवस येतात तर चांगल्या काळात प्रयत्न न केल्यास कठीण दिवस येतात असे मत व्यक्त करीत विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आपल्या आयुष्याचा आरंभ जर चांगला असेल तर शेवट सुद्धा निश्चितच चांगला होत असतो असे मत व्यक्त करून आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारून त्यासाठी वेळेचे नियोजन, संवाद कौशल्य, नेतृत्व कौशल्य इत्यादीवर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जीवन जगतांना नकारात्मकता सोडून सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याची गरज विशद केली प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत प्रगती ही तिच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनेवरून आपण काय स्वीकारतो यावर अवलंबून असून या संदर्भातील उदाहरण देऊन प्रेरणा कोणाकडून आणि कशी घेतली पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयुर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, श्री.प्रवीण भावे, प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. सोनाली अभंग, प्रा .पूजा राणे , प्रा . माधुरी चौधरी, प्रा. विकास दिघे, प्रा.दिलीप बारी,प्रा. परमेश्वर भत्तासे,प्रा,पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज,डॉ. छाया जोशी,प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा.डॉ . समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. डॉ. प्रीती बुऱ्हाडे, प्रा.पूजा खवले इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रीकांत लांबूर्ड याने केले तर उपस्थितांचे आभार प्रा. पूजा खवले यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.