शबनम न्युज | प्रतिनिधी :
श्रीमंत सरदार श्री विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन दिनांक 22 ऑगस्ट 2023 वार मंगळवार रोजी लोहगड येथे संपन्न झाला
किल्ले लोहगड येथे शिव मंदिरामध्ये तसेच कार्ले येथे एकविरा आई मंदिरात पूजा करण्यात आली. शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले आपल्या पराक्रमी पुर्वजाकड़ून व गौरवशाली इतिहासातुन प्रेरणा घेवून तरुनानी देशोन्नतीसाठी योगदान द्यावे असा संदेश त्यानी आपल्या व्याख्यानातुन दिला
इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे सहायक पोलीस निरीक्षक श्री उमेश कारके यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमास शिवसेना नेते श्री भारत ठाकुर तळेगाव नगरीचे माज़ी नगराध्यक्ष श्री कृष्णराव कारके पंचायत समीती सदस्य साहेबराव कारके मा सरपंच श्री बालासाहेब कारके श्री नारायन कारके,अशोक कारके, संजय कारके श्री सचिन टेकवडे श्री शिरीष महाराज मोरे श्री कुंदन कारके एकता प्रतिष्ठाणंचे अध्यक्ष श्री योगेश कारके ,संस्थापक- बाळासाहेब घारे, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर विशाल कारके , सोमनाथ खिलारी ऋषीकेश कारके व एकता प्रतिष्ठाण डोणेचे सर्व पदाधिकारी व सभासद तसेच उर्से,डोणे,आढे, देहू लोहगड येथील ग्रामस्थ उपास्थित होते.