शबनम न्युज | पुणे
भोसरी मधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देणार, असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भाजप जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेव्हा ते बोलत होते.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षाची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागूया, भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी माझी, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
या बैठकीत आमदार महेश लांडगे, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडपसर चे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कांत, जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंह एरंडे, डॉ. ताराचंद कराळे. राम गावडे. संतोष खैरे. आदि लोकसभेतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.