शबनम न्यूज प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 28 राहटणी पिंपळे सौदागर मधील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून सुटला आहे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता सदरबाब शत्रुघ्न काटे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या कविता उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
प्रभाग क्र.२८ रहाटणी, पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोड वरील पीस व्हॅली ते साई पर्ल सोसायटी पर्यंत आणि राजमाता जिजाऊ उद्यान ते साई प्लॅटिनम सोसायटी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्याचे काम प्रलंबित होते. सदर प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राजमाता जिजाऊ उद्यान लगत बांधण्यात आलेली नवीन २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मधून पाणीपुरवठा करता येत नव्हते. यामुळे परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात सुद्धा पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. सदर बाबीची तातडीने दखल घेत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रलंबित असलेले या १२ इंच नवीन पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरु करण्याच्या सूचना संबंधित पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेत कुणाल आयकॉन रस्ता येथे १२ इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.