शबनम न्युज | प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात परिसरात रात्री बारा वाजल्यापासून संततधार पाऊस झाला आहे . सर्वाधिक ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद पिंपरी चिंचवडमध्ये झाली आहे. मगरपट्टा सिटीत ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.मोसमी पावसाच्या यंदाच्या हंगामात म्हणजे जूनपासून ऑगस्टअखेर पुण्याला संततधार पावसाने हुलकावणी दिली होती. हंगामात पहिल्यांदाच अशा प्रकारचा संततधार पाऊस पुण्यात होत आहे. त्यामुळे पुणेकर सुखावले आहेत.
Advertisement