शबनम न्यूज | प्रतिनिधी :
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडकर्त्यांनी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव. यांचा समावेश आहे.
Advertisement