शबनम न्यूज | प्रातिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील नगरसेवक वसंत शेठ बोराटे तसेच साईनाथ मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य असा दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला. दहीहंडी महोत्सव हा एक सामाजिक सलोखा जपणारा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर दहीहंडी सोहळा सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अंशुल कॉसमॉस ग्राउंड वैशाली स्वीट होम जवळ, अनंत नगर, देहू रस्ता, मोशी येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री मधुरा देशपांडे (शुभविवाह फेम) राशी खन्ना अभिनेत्री व मुरब्बा फ्रेम शिवानी मुंडे कर या अभिनेत्री प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थितीत होत्या, त्यांना पाहण्या साठी अनेक तरुण तारुंनींनी अक्षरशः गर्दी केली मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव संपन्न झाला.
या भव्य उत्सवात मोठ्या उंचीवर बांधण्यात आलेल्या दहीहंडी फोडण्या साठी गोविंदा पथक शर्तीने प्रयत्न करत होते ,या दहीहंडी सोहळ्यात एकूण 25 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला या दहीहंडी उत्सवामध्ये अकरा हजार रुपये सलामीला आणि 51 हजार रुपये मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला बक्षीस देण्यात आले , यामध्ये बालवीर गोविंदा पथक चाकण यांनी मानाची दहीहंडी फोडली.
दहीहंडी उत्सवाला असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडला या दहीहंडी उत्सवात तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. ढोल ताशाच्या गजरात सदर उत्सव नसा नसा उत्साह भरत होता, तरुणाई या दहीहंडी उत्सवात रमून गेली होती. भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा तसेच नागरिक तरुण-युवक युवतींचे आभार यावेळी नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांनी व्यक्त केले.