शबनम न्यूज | प्रातिनिधी
डाॅ. एल. आर. भालेराव
पोलीस सारथी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शहाजीराजे भोसले तथा उपध्यक्ष मा. श्री. सुरज कोळी यांच्या आदेशाने .सौ.हिना मुलाणी यांची पोलीस सारथी संस्थेच्या महिला अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) पदी निवड करण्यात आली.
संस्थेचे सर्व पदअधिकारी यांची गणेश उत्सवानिमित्त सभा आयोजित करण्यात आली या सभेत हि नियुक्ती करण्यात आली या मध्ये पोलीस निरीक्षक मा. श्री. रामचंद्र घाडगे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले
पोलीस सारथी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यात पोलीस बांधवाना मदत म्हणून कार्यरत आहे संस्थेच्या नावाला कोठे हि गालबोट न लावता आपण दक्षता बाळगली पाहीजे तसेच संस्थे मार्फत पुणे जिंल्ह्यातच नव्हेतर संपुर्ण महाराष्ट्रात पोलीसांना सहकार्य असते.
रामचंद्र घाडगे साहेब यांनी मार्गदर्शन करतं सांगितले कि पोलीस सारथी संस्थेच्या माध्यमातुन चांगले काम करावे , पोलीस सारथी संस्थेच्या आय डी कार्ड चा दुरउपयोग करु नये ,शहाजीराजे हे आज सर्वांना घेऊन चालत आहेत संस्था चालवणे सोपे नसते तुमची टीम सतत आता गणपती, नऊरात्र उत्सावात सहकार्यास असेलच सोबत एकमेकांना मोठे सहकार्य लाभेल व संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष पुण्यातील उद्योजक छत्रपती मोटर्स चे मालक मा. श्री. शहाजीराजे अंकुशराव भोसले (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य) यांना व संपुर्ण पोलीस सारर्थी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेंच्छा देतो. या शब्दात शुभेच्छा दिल्या
या वेळी पदअधिकारी सुरज कोळी(उपाध्यक्ष-महा. राज्य) अजित दुबे(सचिव-महा.राज्य) अशोक उंडे(महासचिव-म.राज्य) नीरज साळुंखे (कार्याध्यक्ष-महा. राज्य) अरविंद वाघ(संपर्क प्रमुख-महा. राज्य) शुभम ससे (युवा अध्यक्ष-महा.राज्य) बिरजू जाधव (सहसचिव-महा. राज्य) ओंकार दाते (प्रसिद्धीप्रमुख-महा. राज्य) डाॅ. एल. आर. भालेराव (सोशल मिडीया पुणे जिंल्हाध्यक्ष) विश्वनाथ चंदा (मावळ – हवेली ता. अध्यक्ष) सुरज पांढरे (पिं-चिं शहरध्यक्ष) राहुल अंबावले (पिं-चिं सोशल मिडिया शहरध्यक्ष) अतुल काटे (रावेत पुनावळे विभाग अध्यक्ष) संदेश केंजळे (रावेत – पुनावळे कार्यध्यक्ष).उपस्थीत होते