शबनम न्यूज | पिंपरी
महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले की खूप ज्ञान संपादन केले असा समज करून घेतला जातो. परंतु, हे पूर्ण सत्य नाही; तर शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच कार्यरत राहून ज्ञानसंचय जमा करा, असे मार्गदर्शन असोसिएटेड स्पेस चे संचालक वास्तुविशारद प्रकाश देशमुख यांनी केले.
पीसीईटीच्या एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी विवा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, मुंबई चे प्राचार्य आर्किटेक्ट चकोर मेहता, एमएपीएस डिझाइनच्या पद्मा शिंपी, बीएनसीए चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, सिम्बायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर, पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी आर्किटेक्ट चकोर मेहता, पद्मा शिंपी, प्रियंका लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शैक्षणिक श्रेणी धारकांचा सत्कार आणि एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि डिझाईनच्या निवडलेल्या विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांचा बॅजिंग समारंभ पार पडला.
सूत्रसंचालन नेहा अनवाणे, रूतुराज कुलकर्णी, चैतन्य बागुल, शिवा शिशोदिया यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.