शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी, दि. 19 सप्टेंबर 2023:- पीओपी (POP) च्या गणेशमूर्तीं ऐवजी शाडू माती, धातू, लाकूड, दगड, तूरटी अथवा कागदाच्या लगद्या पासून तयार करण्यात आलेली गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी. उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास मंडळाने त्याचा स्वीकार करावा. शासनाकडील मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने श्रीं च्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक संदर्भात शासनाकडील सूचनांचे तसेच पोलीस यंत्रणांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती ठेवण्याची जागा उपलब्ध आहे अशा मंडळांनी शक्यतो गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना त्याच ठिकाणी करावी जेणेकरून मंडपामुळे रहदारीस/ वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. सार्वजनिक गणेश मंडळानी श्रीं ची मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात सीसीटीव्ही बसविणेबाबत कार्यवाही करावी. श्रीं च्या आरती आणि पुजेचेवेळी होणा-या गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विद्युत रोषणाईचा व ध्वनिक्षेपकाचा वापर कायदेशीर मर्यादेत करावा. ध्वनीची पातळी नियंत्रीत ठेवावी. श्रीं चे मूर्ती परिसरात कार्यक्रम / उपक्रम राबविताना योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच गर्दीमुळे कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळांनी नागरिकांना श्रीं च्या दर्शनाकरीता दृकश्राव्य किंवा डिजीटल माध्यमांचा वापर करावा. मंडळांनी श्री गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इ. द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करावा.
मंडळांनी आमंत्रणे दिलेल्या व्हीआयपी निमंत्रितांच्या आगमानाच्या वेळी व कार्यक्रमाच्या दरम्यान आवश्यक ती दक्षता घ्यावी. गर्दीमुळे कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळ परिसरात फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने कमीत कमी असतील याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र शासनाचे अधिनियमानुसार प्लास्टीक पिशव्या व इतर प्लास्टीक वस्तूंवर बंदी करणेत आली असल्याने त्यांचा वापर टाळावा. गणेशोत्सव कालावधीत रस्ता पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही.अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रिक्षा सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक राहील. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम २००० मधील परिच्छेद ४ चे तरतूदीप्रमाणे रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी १०० मीटरचे परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये तसेच मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा कमीत कमी वापर करावा.
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर यांनी केलेले आवाहन
गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.
मंडळाजवळ हजर स्वयंसेवक, कार्यकर्ते, नागरिक यांनी मद्यसेवन करु नये तसेच मद्यसेवन केलेल्या व्यक्तीला मंडळाच्या मंडपाजवळ येण्यास प्रतिबंध करावा. कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. काही अनोळखी, संशयीत, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरतांना रेंगाळताना दिसल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे. गणेश मूर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणा-या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीं च्या मुर्तींचे संरक्षणाकरीता मंडळाचे कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी तसेच गर्दी टाळावी.
नागरिकांना गणेश विसर्जना बाबत सूचना
घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी शक्यतो घरी करण्यास व मूर्तीदान करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन मंडपालगत ( कृत्रिम हौदामध्ये ) करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश विसर्जन दिवशी ( दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेले सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत तसेच त्या मूर्ती विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत. श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी २ कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणांवर उपलब्ध असतील. आवश्यकता असल्यास अधिकचे कन्वेअर बेल्ट उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक प्रभागातील सुशोभित रथाच्या मूर्ती संकलनासाठी Route Chart ( मार्ग क्रमणिका ) प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानुसार नागरिकांनी व मंडळांनी गणेशमूर्तीं दान कराव्यात तसेच निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य द्यावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल. अशा सूचना पिंपरी चिंचवड मनपाचे मा. आयुक्त तथा प्रशासकसो व पिंपरी चिंचवड शहरचे मा. पोलीस आयुक्तसो यांनी दिल्या.
नागरिकांना पुढीलप्रमाणे पोलीस मदतीसाठी महत्वाचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत
नियंत्रण कक्ष, पिंपरी चिंचवड 020-27352500 / 600 / 27450888 / 26209122, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड 020-27350555, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड 020-27350444, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पिंपरी चिंचवड 020-27350120, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ 020-27445456, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ 020-27445345, वाहतुक नियंत्रण कक्ष, पिंपरी चिंचवड 020-27610015 / 27610016, विशेष शाखा 020-27350937
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाद्वारे मदतीसाठी क्षेत्रीय कार्यालये / क्षेत्रीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक
अ क्षेत्रीय कार्यालय – श्रीम. सूचिता पानसरे 020-68334000 / 9028887631, ब क्षेत्रीय कार्यालय – श्री. अमित पंडित 020-68334300 / 9890019232, क क्षेत्रीय कार्यालय – श्री. अण्णा बोदडे 020 68334500 / 9922501942, ड क्षेत्रीय कार्यालय – श्री. किरणकुमार मोरे 020-68334700 / 9922501459, इ क्षेत्रीय कार्यालय – श्री. राजेश आगळे 020-68335000 / 9552511972, फ क्षेत्रीय कार्यालय – श्री. सिताराम बहुरे 020-68335300 / 9923989774, ग क्षेत्रीय कार्यालय – श्रीम. शीतल वाकडे 020-68335500 / 9422320697, ह क्षेत्रीय कार्यालय – श्री. उमेश ढाकणे 020-68335700 / 8830829091, सुरक्षा विभाग – श्री. उदय जरांडे 020-67331512 / 9552790101, अग्निशामक विभाग – श्री. विजयकुमार थोरात 020-27422405 / 9766597009, पर्यावरण विभाग – श्री. संजय कुलकर्णी 020-67331342 / 9922501739, आपत्ती व्यवस्थापन विभाग – श्री. ओमप्रकाश बहिलवाल 020-67331111 / 7276771077, विद्युत विभाग – श्री. बाबासाहेब गलबले 020-68331420 / 9922501734, सारथी 8888 00 6666, स्मार्ट सारथी 020-67331110