शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी, दि. १८ सप्टेंबर २०२३:- गणेशोत्सव निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 27 मधील श्री काळभैरवनाथ घाट दुरुस्त करावे अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य सागर खंडू शेठ कोकणे यांनी मनपाच्या ग प्रभाग प्रशासनास केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक 27 राहटणी येथील श्री. काळभैरवनाथ घाटाची ड्रेनेजच्या कामामुळे दुरावस्था झाली आहे. येणाऱ्या गणेश विसर्जना दरम्यान गैरसोय होऊ शकते ही गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर घाट दुरुस्त करावा व गणेश मंडळांना गणेश विसर्जन करण्यास कोणत्याही अडचणी येऊ नये याकरिता उपाययोजना कराव्या अशी मागणी सागर कोकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Advertisement