प्रेम कसे होईल, कोणावर होईल, कोण कोणाच्या प्रेमात पडेल, हे सांगता येत नाही. असं म्हणतात की, प्रेमात माणूस आंधळा होतो. त्याला प्रेमाशिवाय बाकी काहीही दिसत नाही, अशीच एक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, लोकांचा या प्रेमावर विश्वास बसत नाही. एका 53 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात चक्क एक 22 वर्षाची तरुणी पडली आहे. तरुणीचे या व्यक्तीवर इतके प्रेम आहे की, ती त्याच्यासाठी आपला जीव देण्यास देखील तयार आहे.
काही युजर्स म्हणत आहे की त्यांनी ऐकले होते, की प्रेम आंधळे असतं पण आज ते पहिल्यांदाच पाहत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर आपल्यापासून लोक या नात्याबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक या व्हिडिओला स्क्रिप्टेड म्हणत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम द्वारे @butterfly__mahi या नावाच्या पेजने शेअर केले आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक देखील केले आहेत. त्याचबरोबर अनेक युजर्सनेया व्हिडिओवर मजेशीर कमेंट देखील केले आहेत. सध्या हे प्रकरण जोरदार व्हायला होत आहे.