शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी, 24 सप्टेंबर 2023: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील आनंदवन, कृष्ठवसाहत या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह तसेच युवा नेते माजी स्विकृत सदस्य अनिकेत काटे यांच्या शुभहस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
त्यानंतर आनंदवन पंच कमिटीचे अध्यक्ष मा.दत्ताराम चव्हाण यांच्या शुभहस्ते माननीय आयुक्त श्री शेखर सिंह यांचा सन्मान करण्यात आला.
Advertisement
या प्रसंगी अनिल कांबळे, सोमनाथ रंदाळकर,महादेव गायकवाड,जितेंद्र चव्हाण,संतोष धोत्रे तसेच सुरेखा दोडमणी लक्ष्मी कापसे,पुनम कांबळे,आदि उपस्थितीत होते.