तुषार कामठे सारख्या तरुण चेहऱ्याला संधी देऊन युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले
शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी, 24 सप्टेंबर 2023: पिंपरी चिंचवड शहरावर नेहमीच अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट अजित पवार यांच्या नेतृत्वानेच केले आहे. अजित पवार यांना पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. परंतु आपल्या या महाराष्ट्रात मागील दोन वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले एक शरद पवार गट तर दुसरा अजित पवार गट त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचेही दोन गट पहावयास मिळत आहे ,साहजिकच अजित पवार भाजपसोबत गेल्याने शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात काम करणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता परंतु अहमदनगर मधील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आता पिंपरी चिंचवड शहराची धुरा आपल्या हातात घेतली असल्याचे दिसत आहे.
मागच्या आठवड्यात रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना बळ दिले तसेच माजी नगरसेवक तुषार कामठे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली व त्याच्या दोन दिवसातच रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण केला.
तुषार कामठे सारख्या तरुण चेहऱ्याला संधी देऊन युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली या नियुक्तीनंतर तुषार कामठे हे पक्ष वाढीसाठी पायात भिंगरी लावल्यासारखे पळत असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली माजी नगरसेवक तुषार कामठे हे मूळचे भाजप पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी आपल्या नगरसेवक पदावर कार्यरत असताना भाजपाच्या आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या चुकीच्या कारभार विरोधात अनेक वेळा आवाज उठविला तसेच चुकीच्या कामां विरोधात आंदोलने केली. असेच निर्भीड नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाला यावेळी हवे होते रोहित पवार यांनी तुषार कामठे यांची शहराध्यक्षपदी निवड करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवीन ऊर्जा दिल्याचे सांगितले जात आहे तसेच तुषार कामटे सारख्या तरुण चेहऱ्याला संधी देऊन युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
आमदार रोहित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळाना भेटी गाठीचा नियोजित दौरा नुकताच पार पडला . गणपती मंडळाच्या दर्शनासाठी रोहित पवार चक्क दुचाकीवर स्वार झाले आणि पावसाची तमा न बाळगता गर्दीच्या गांधी पेठ आणि लिंक रोडवराच्या मंडळाना भेटी दिल्या. या भेटीगाठी पहाटे 3 वाजेपर्यंत सुरु होत्या.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छेने ढोल ताशा व फुलांच्या पायघड्या घालून रोहित पवार यांचे स्वागत केले.मंडळाना भेट देणार म्हणून अनेक मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोहित पवार यांनी पिंपरी येथील सुखवानी गृहनिर्माण संस्था तसेच पुनावळे येथील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या भेटी देऊन नियोजित कचरा डेपो बाबतीत चर्चा केली. शहरभर फिरताना रोहित पवार यांनी एकाही कार्यकर्त्याला नाराज न करता सर्व गणेश मंडळाना पहाटे 3 वाजेपर्यंत भेटी दिल्या. .
या वेळी महिलांचा हि सहभाग मोठ्या प्रमाणात होता रोहित पवार यांचा चाहता वर्ग या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराने पाहिला.शहराला एक नवीन युथ आयकॉन आणि नवीन आपला दादा मिळाल्याची भावना युवकांमध्ये दिसत होती.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी शहरातील अनेक जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
आगामी काळात रोहित पवार, शहर अध्यक्ष तुषार कामठे आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे हे युवा आणि जेष्ठ यांची सांगड घालून नवीन बदलच्या दिशेने पाऊल टाकत आहेत अशी चर्चा शहरभर होत आहे.
यावेळी त्यांनी अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत सेल्फी काढली , . रोहित पवार आणि अध्यक्ष तुषार कामठे यांनी या दौऱ्यात गणेशा चे मनोभावे दर्शन घेउन शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी गणरायाचे आशीर्वाद घेतले .
आमदार रोहित पवार यांनी चिंचवड मधील नवं तरुण मंडळ,सोनिगरा निलय हाऊसिंग सोसायटी, गांधीपेठ मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, काळभैरवनाथ मित्र मंडळ, अखिल भाजी मंडई मित्र मंडळ, संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ आणि पागेची तालीम मित्र मंडळ तसेच शहरातील श्री विठ्ठल तरुण मंडळ, सम्राट मित्र मंडळ, सहयोग मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, शिवराय मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, चैत्रबन, नवयुग, बारामती मित्र मंडळ, संत तुकाराम मित्र मंडळ, पवनानगर मित्र मंडळ क्रांती क्रीडा मंडळ, सहयोग मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, ज्योती मित्र मंडळ, मित्र सहकार्य तरुण मंडळ, साधू वास वाणी मंडळ, शिवसम्राज्य मंडळ, भाट मित्र मंडळ समता नगर मित्र मंडळ, सत्ता प्रतिष्ठान, शिवराया मित्र मंडळ, शिव प्रतिष्ठान मराठा युवा प्रतिष्ठान, आझाद मित्र मंडळ, श्री समर्थ तरुण मंडळ, नानापेठ तरुण मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान,
शिव साम्राज्य मित्र मंडळ, ओम मित्र मंडळ, शिवसम्राज्य प्रतिष्ठान आदी मंडळाचे दर्शन घेतले.
यावेळी सुलक्षणाताई शिलवंत, गणेश भोंडवे, इम्रान शेख, ज्योती निंबाळकर, काशिनाथ जगताप, देवेंद्र तायडे, राजन नायर, मयूर जाधव, विशाल जाधव,प्रशांत सपकाळ,सागर चिंचवडे, निलेश पुजार, रोहिणी वारे,राजू खंडागळे,राहुल धनवे आणि मुख्य प्रवक्ते माधव पाटील सोबत होते.