शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवस निमित्त संपूर्ण भोसरी मतदार संघात मागील एक महिन्यापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक ,मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित होत आहेत आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चाऱ्होली परिसरातील युवानेते सुनील अण्णा काटे यांच्या वतीने त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात ज्या नागरिकांनी नेत्रतपासणी केली व ज्या नागरिकांना चष्मे ची आवश्यकता आहे अशा नेत्र रुग्णांना आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप करण्यात आले, या वेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते तसेच सुनील अण्णा काटे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार महेश दादा लांडगे यांनी सुनील अण्णा काटे हे करीत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.