शबनम न्युज | पुणे
पुण्यात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देखील मिरवणूक सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी देखील सुरूच आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळांनी दुपारी 4 ते सायंकाळी 8 या वेळात लक्ष्मी रस्ता पार केला. मात्र, त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. आता बहुदा मिरवणूक पूर्ण व्हायला नेहमी इतकाच वेळ लागेल, अशी चिन्ह आहेत. रात्री बारा वाजता बंद झालेले डीजेचे आवाज शुक्रवारी सकाळी 6 वाजता परत सुरु झाले. त्यानंतर पुन्हा एकदा लक्ष्मी रस्ता डीजे दणदणात घुमू लागला.
सकाळपासून लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या चारही रस्त्यावरून मिरवणुका सुरू आहेत. सर्वत्र मोठे मोठे डीजे लावल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी विनंती करूनही मंडळाच्या पदाधिकारी खेळ दाखविल्याशिवाय पुढे जायला तयार नव्हते. अखिल मंडई मंडळाचा शारदा, गणेश, अलका चौक पार्क झाल्यावर भाविकांच्या गर्दीचा पूर एकदम ओसरला. कार्यकर्त्यांची गर्दी मात्र कायम होती. यंदाही मागच्या वर्षी प्रमाणे रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.