शबनम न्युज | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला प्रतिसाद देत आज १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने स्वच्छता मोहीम सकाळी 10 वाजता अष्टविनायक चौक ते वाघू साने चौक पर्यंत आयोजित करण्यात आली होती.यानिमित्त उपस्थित राहत स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते मनोजभाऊ जरे व नीलिमा जरे यांनी आपला सहभाग नोंदविला
या स्वच्छता मोहिमेस महानगरपालिकेचे अधिकारी,कर्मचारी,बचत गटातील महिला भगिनी तसेच आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थिती लावत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.म, अजित कुलथे, पराग जोशी, अनिल गावडे, चिंचवडमधील महिला बचत गट, हुतात्मा चापेकर मनपा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, मनपा अधिकारी व चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.