शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंजवडी येथे 24 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला. सदर घटनेचा तपास करीत असताना, पोलिसांना काही संशयास्पद व्यक्तीला गृहीत धरून तसेच गुन्हे पथकातील यांच्या मार्गदर्शनातून या घटनेतील आरोपी अक्षय भास्कर खिल्लारे (वय 21) याला अटक करण्यात आली आहे.
किशोर प्रल्हाद पवार (वय 35, रा, सुसगाव, मोशी) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर हा 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घरातून बाहेर पडला. पती परत परतला नसल्याने त्याची पत्नी रेणुका पवार हिने हिंजवडी पोलीस ठाण्यात 25 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केले. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला असता, आरोपी अक्षय खिल्लारे यास अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर याच्या पत्नीसोबत आरोपी अक्षय याचे अनैतिक संबंध होते. ही बाब किशोरच्या समोर आली होती, किशोरला माहिती मिळाल्यानंतर तो दोघांवर संशय घेऊ लागला होता. त्यामुळे अक्षय खिल्लारे याने हत्या करण्याच्या उद्देशाने किशोर पवार याला फोन करून माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे, माझ्यासोबत चल असे खोटे सांगून सायंकाळी साडेचार च्या सुमारास गेला, त्यानंतर पुण्याच्या जवळ घेऊन जाऊन लघवी करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवून किशोरला पाठीमागून विळ्याने तसेच त्याच्या मानेवर व चेहऱ्यावर वार करून त्यास जीवे मारून कोणालाही सापडून नाही, यासाठी त्याचे कपड्याने त्याचे हात पाय बांधून वारक या गावातील मोशी डॅमच्या धरणाच्या पाण्यात फेकून दिले, अशी माहिती तपासून पोलिसांना दिली.
हिंजवडी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी 11 18 20 23 भादवी कलम 364 3002 201 प्रमाणे आरोपी अक्षय भास्कर त्याला अटक केली आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहायुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडल काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाण्यातील डॉ. विवेक मुगळीकर ,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबाबू देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पथकातील सागर काटे, राम गोमारे, अजितकुमार ,बंडू मारणे, बापूसाहेब धुमाळ, बाळकृष्ण शिंदे ,कैलास केंगळे, विक्रम कुदळ ,योगेश शिंदे, कुणाल शिंदे, सुनील डामसे, अरुण नरवले, नरेश बलसाने, पोलीस नाईक रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण ,चंद्रकांत गडदे, पोलीस शिपाई अमर राणे, कारभारी पालवे ,ओम प्रकाश कांबळे व शिंदे, सागर पंडित यांनी केले.