श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी वैयक्तिक शतक झळकावताना विक्रमी भागीदारी केली आहे . त्यानंतर एडन मार्करमने चौकार-षटकारांची आतषबाजी करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक नोंदवले. शिवाय दक्षिण आफ्रिकेनेही वर्ल्ड कप स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.
डेर ड्युसेन ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांवर बाद झाला. एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे वेगवान शतक ठरले. मार्करमने यापूर्वी नेदरलँड्सविरुद्ध ३७ चेंडूंत शतक झळकावले होते. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकाच सामन्यात तीन शतकवीर होण्याची ही पहिलीच घटना आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक ३ वेळा ४००+ धावा केल्या आहेत आणि वन डेत त्यांच्या नावावर ८ वेळा हा पराक्रम आहे.