शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला तर काहीजण बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लीक झाल्याने हा प्रकार घडला आहे. पोहण्यासाठी 22 जण गेले असता, त्यापैकी 11 जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिल्या माहितीनुसार, परिसरात 500 मीटर पर्यंत क्लोरीन गॅस पसरला होता. त्यामुळे जलतरण तलावाच्या समोर जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचलेले आहेत. सकाळच्या बॅचला 20 ते 12 जण होण्यासाठी आले होते, त्यापैकी 11 जणांना हा त्रास झाला.
Advertisement