शबनम न्युज | मुंबई
मुंबईतील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे दसरा मेळावा घेण्याकरिता शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेईल? या प्रश्नावर उत्तर मिळाले आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, शिंदे गटाकडून सदर अर्ज मागे घेण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज मागे घेतला आहे, यामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवाजी पार्कचे मैदान आम्हाला हिंदुत्वाच्या विचारांसाठी मिळावे, अशी आमची भूमिका होती. पण वाद टाळण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हिंदुत्वाचे विचार आपल्याला मांडता येतील, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली, यामुळे शिवाजी पार्क येथे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.