शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे वाहतूक शाखेने शहरातील चतुर्श्रुंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर या तीन ठिकाणच्या वाहतुकीत बदल केला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त हा बदल करण्यात आला असून, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असून बुधवार चौक, आप्पा बळवंत चौकशी एकेरी वाहतूक सुरू राहील, पर्यायी मार्ग-आप्पा बळवंत चौक, गाडीतळ पुतळा येथून शिवाजी रोडने इच्छित स्थळी जाता येईल.
तर चतुश्रुंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर या तीन ठिकाणच्या वाहतुकीत देखील बदल केला असल्याने भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता येईल, यादरम्यान वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या सूचनेवरून बदल करण्यात आलेले आहे.
पर्यायी रस्ते –
१) संत कबीर चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकाकडून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी ए.डी. कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा पद्मजी चौकी येथून उजवीकडे वळून जुना मोटार स्टॅण्डपर्यंत येऊन इच्छितस्थळी जावे.
२) ढोले पाटील चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकीसमोरून भवानी माता मंदिर रस्त्यावरून जुना मोटार स्टॅण्डकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी भगवान बाहुबली चौकातून जुना मोटार स्टॅण्डकडे जावे.
३) रामोशी गेट येथून जाणारी पीएमपी बसेसची वाहतूक सेव्हन लव्ह चौक येथून डावीकडे वळून गोळीबार मैदान चौक, डावीकडे वळून खाणेमारुती चौक अशी सुरू राहील. जेणेकरून नवरात्र उत्सवादरम्यान भवानी माता मंदिर या भागात वाहतूककोंडी होणार नाही.
४) सेव्हन लव्ह चौकातून येणारी वाहतूक गोळीबार मैदानाकडे वळविण्यात यावी. मालधक्का चौकाकडून येणारी वाहतूक आरटीओ – पुणे स्टेशन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी वळविण्यात यावी. बोल्हाई चौकातून जाणारी वाहतूक मालधक्का चौक येथे वळविण्यात यावी.