शबनम न्यूज प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी दांडिया गरबा नृत्याचे चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव हा घटस्थापनेच्या प्रथम दिवसापासून सुरू होतो तर दसऱा सणाच्या दिवशी या नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येते. या नऊ दिवसाच्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक मंडळे, सोसायटी धारक आपापल्या परिसरात विविध उपक्रम राबवीत असतात, यामध्ये दांडिया नृत्य ,गरबा नृत्य बरोबरच महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन, व लहान बालकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रार्थना ,अर्चना ,आरती केली जाते.
पिंपरी चिंचवड शहरातील विजय पार्क परिसरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या विजयपार्क नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने या परिसरातील रहिवासी, कुटुंब एकत्रित येऊन हा नवरात्र उत्सव साजरा करत असतात.मागील ३३ वर्षांपासून या महोत्सवाचे प्रमुख धीरेंन शाह व त्यांचे सहकारी एकत्रित येऊन हा नवरात्र उत्सव साजरा करत आहेत .
यामध्ये सर्व जाती-धर्माचे कुटुंब उत्सवात सहभागी असतात, विजयपार्क मधील नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मातेची आरती ,सजावट, भजन, भक्ती गीत मनोभावाने सादर केले जाते. दांडिया व गरबा नृत्यात मोठ्या उत्साहात सर्वच जण सहभाग घेतात या नवरात्र उत्सवात येथील सर्वच रहिवाशी एकत्र येतात मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने केले जाते.
त्याचबरोबर यावर्षीच्या विजय पार्क नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भव्य राम मंदिराचाही देखावा उभारण्यात आला आहे . या देखाव्याच्या उभारण्यासाठी या परिसरातील सर्वच जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा देखावा उभारला आहे. या निमित्ताने विजय पार्क सोसायटी मधील रहिवासी यांनी या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आहे .
या परिसरातील माजी नगरसेविका गीता मंचरकर यांनी हि या नवरात्र उत्सवास भेट देऊन विजय पार्क नवरात्र उत्सवानिमित्ताने सर्व जाती-धर्माचे कुटुंब उत्सवात सहभागी होतात, सगळे मिळून मिसळून उत्सव साजरा करतात या उत्सवाची भव्यता पाहता आयोजकांचे कौतुक करत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.