शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपळे गुरव:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील प्राथमिक शाळेत लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने सॅनिटरी नॅपकीन इंस्टॉलेशन व डिस्कार्ड बसविण्यात आले त्याचे उद्घाटन लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3234 D 2 रिजन 4 चे रिजन चेअरपर्सन एम. जे. एफ. ला. धनराज मंघणानी व झोन चेअरपर्सन एम. जे. एफ. ला. दत्तात्रय संकपाळं यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. प्रतिक्षा माने यांनी मासिक पाळी बाबत मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणल्या की मुलींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे व मासिक पाळीच्या काळात मुलींनी घाबरून न जाता आपल्या शिक्षकांशी बोलावे आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे . यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी खजिनदार ला शिवाजीराव माने यांनी या मशिन बद्दल माहिती सांगितली. अशा प्रकारची मशिन बसणारी सांगवी पिंपळे गुरव परिसरातील ही दुसरी शाळा आहे. तसेच महापालिकेच्या कस्पटे वस्ती शाळेत ही अशी मशिन बसवली आहे.
रहरणी क्लब फक्त मशिन पुरवत नाही तर त्याला लागणारे पॅड पण कायम स्वरुपी मोफत देणार आहे. लायन्स क्लब हा नेहमीचं अशा गोष्टीना प्राधान्य देऊन गरजू पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतं असतो. असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी चे अध्यक्ष ला.अमोल दापुरकर, ॲक्टीव्हीटी चेअरपर्सन ला. सुजाता चव्हाण, फस्ट लेडी ला. अंजली दापूरकर, ला. प्रशांत गोमकाळे, ला. प्रमोद भोंडे, ला. विक्रम शक्तावत, ला. विजय चव्हाण,मुख्याध्यापिका सौ.भारती वर्णे वर्गशिक्षक श्री.बाबुराव लांघी,श्री.नामदेव चौगुले सर, सर,श्री.संतोष गिड्डे,श्री.सतीश ढमाळ,श्री.सुरेश मिसाळ,श्री,अमोल गावडे सौ.सुचिता वारूळे सौ.शारदा माळी,सौ.चित्रा शेवकरी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.शारदा माळी व आभार श्री.संतोष वाघमारे यांनी केले.