शबनम न्यूज | पुणे
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘अस्मी‘ या कथक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नृत्य प्रशिक्षक प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्या वृंदना मोहरीर,देविका पानसे या कथक नृत्यसादर करणार आहेत.त्यांना ईशान परांजपे(तबला),कृष्णा साळुंके(पखवाज),यशवंत थिट्टे (हार्मोनियम),शुभम खंडाळकर(गायन) साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम शनीवार, ४ नोव्हेबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८८ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.