शबनम न्युज : पिंपरी चिंचवड
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील कु.अनुज काळूराम गावडे (१२वी कला)या खेळाडूंचीे खेलो इंडिया युथ गेम्स 2024 या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी दि. १८ते२२ या कालावधीत तामिळनाडू राज्यात होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. गतवर्षी देखील या खेळाडूने खेलो इंडिया युथ गेम राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र राज्याला कांस्यपदक मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर , विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.