शबनम न्यूज | पुणे
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल आर्ट्स तसेच डिपार्टमेंट ऑफ पीस स्टडीजच्या वतीने आयोजित ‘विश्वशांती’ विषयावरील राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांनी उदघाटन केले.ज्येष्ठ चित्रकार डॉ.सुधाकर चव्हाण,युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड,कुलगुरू डॉ.रवीकुमार चिटणीस,डीन प्रा.विनय मुंदडा,प्रा.मिलिंद पात्रे,रजिष्ट्रार गणेश पोकळे,प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ.श्रुती निगुडकर,डॉ.संजय उपाध्ये हे मान्यवर उपस्थित होते.प्रा.सागर गोटखिंडीकर,पल्लवी राजवाडे,योगद्रुम केळकर यांनी संयोजनात मदत केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या प्रदर्शित राज्यातील दोनशे चित्रकारांनी भाग घेतला.२७ आणि २८ ऑकटोबर रोजी हे प्रदर्शन उत्साहात पार पडले.राज्यस्तरीय स्पर्धेनंतर त्यातील निवडक उत्कृष्ट चित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला.या कलाकारांचा गौरव करण्यात आला.