शबनम न्युज पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे., शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 0२.११.२0२३ ते 0४.११.२0२३ या दरम्यान महिला उद्योजक विकास आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे समन्वयक मा. श्री. रियाज पिरजादे , जिल्हा परिषद समन्वयक मा. अनिल वखारे व प्रशिक्षिका दिपाली महाजन यांच्या शुभहस्ते यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर सर्व पाहुण्यांच्या हस्ते २0२३-२४ मधील ‘ज्ञानदीप’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप बारी यांनी केले. या वेळी मार्गदर्शन करतांना मा.श्री. रियाज पिरजादे – SPPU समन्वयक यांनी महिलांसाठी असलेल्या वेगवेगळ्या उद्योगांचा आढावा घेऊन पिको फॉल, गारमेंट्स हे उद्योग महिलांसाठी कसे महत्वाचे आहेत या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच मा श्री अनिल वखारे – जिल्हा परिषद समन्वयक यांनी ग्राम संघ ही संकल्पना स्पष्ट करून प्रत्येक ग्राम संघात २५ महिला कशा कार्यरत आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रशिक्षिका मा. दिपाली महाजन यांनी उपस्थित सर्व महिलांचे हार्दिक स्वागत केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी ‘ महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण ‘ हे श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे ब्रीद वाक्य उद्योजक महिलांसाठी कसे महत्वपूर्ण असून प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ डॉ. प्र.चि.शेजवळकर व डॉ शरु रांगणेकर यांनी महिलांकडून कसे व्यवस्थापनाचे धडे घ्यावे या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख करून महिलाही उत्तम व्यवस्थापक असते या संदर्भात विवेचन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री.मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज,डॉ. छाया जोशी,प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे,प्रा.समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा.प्रीती बुऱ्हाडे,प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा.पूजा खवले, श्री.प्रविण भावे, कु.नेहा लांडगे इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी महिला प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी मानले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.