शबनम न्युज | पुणे
विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पालकमंत्री असताना दर आठवड्याला पुण्यातील कामांचा आढावा घेत होते. मात्र, आता दुर्दैवाने तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे कामांचा आढावा होत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेत्या आणि बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध नागरी समस्यावर चर्चा देखील केली.
अजित पवार हे पालकमंत्री असताना दर आठवड्याला पुणे शहराच्या दौऱ्यावर असायचे. पुण्यातील कामांचा आढावा घ्यायचे, पण आता तीन महिन्यांपासून पुणे जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कामे अडखळले आहेत.
Advertisement