शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याप्रसंगी खडसे यांच्या पत्नी मंदीकिनी खडसे याही उपस्थित होत्या.
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुढील तपासण्या होत आहेत. तत्पूर्वी, मुक्ताईनगरला खडसेंच्या छातीत दुखायला लागले, त्यांना गजानन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
काल अचानकपणे आमदार एकनाथ खडसे यांच्या छातीत त्रास होत असल्याने त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्बुलन्स द्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले.