शबनम न्युज | पुणे
पुण्यात लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या नाकावर जोरदार ठोसा लगावला. त्या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार दुपारी पुण्यातील वानवडी भागात गंगा सॅटॅलाइट नावाची उच्चभ्रू सोसायटी मध्ये घडली.
निखिल पुशुराज खन्ना (वय 36 )असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निखिल याची पत्नी रेणुका खन्ना हिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका आणि निखिल या दोघांचा 2017 मध्ये प्रेम विवाह झाला होता. निखिल हे पत्नी रेणुका आणि त्यांच्या आई-वडिलांसह राहत होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिले नाही. तसेच दुबईला घेऊन गेला नाही, या कारणावरून दोघांचे शुक्रवारी भांडण झाले. या भांडणात रेणुकाने निखिलच्या नाकावर ठोसा मारला. या घटनेत निखिल यांचे नाकाचे हाड फॅक्चर झाले आणि बराच रक्तस्त्राव झाला. या घटनेनंतर रेणुकाचे सासरे आणि निखिल यांचे वडील डॉ. पुष्पराज खन्ना यांनी निखिलला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखिल ने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी रेणुकाला अटक केली.