शबनम न्युज | पिंपरी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेची दिनांक 26 /11 /2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड कलादालन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा झाली.
या सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते. या सभेमध्ये सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष – सुनील महाजन, उपाध्यक्ष -समीर हंपी, प्रमुख कार्यवाह -सत्यजीत धांडेकर, कोषाध्यक्ष -दीपक गुप्ते, कार्यकारणी सदस्य- प्रथमेश कदम ,डॉ.वासंती जोशी, अभिषेक महाजन, गिरीश गोडबोले, दीपक पवार ,केतकी बोरकर, मदन गायधने ह्या सर्वांची सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी एकमताने निवड झाली.