शबनम न्युज | पिंपरी
भारतामध्ये प्रचंड ज्ञानसंपदा आहे. या प्रतिभेला नवी दिशा देण्याची गरज आहे. तळेगाव आणि मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी देशभरात नावलौकिक असलेले नारायणा कोचिंग केंद्र तळेगाव मध्ये सुरू झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून भविष्यातील आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनियर्स तयार होऊन देशसेवा करतील, असा विश्वास इंद्रायणी विद्या मंदिरचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केला.
इंद्रायणी विद्या मंदिरच्या शैक्षणिक संकुलात नारायणा कोचिंग केंद्राचा शुभारंभ रविवारी (दि.३ डिसेंबर) रामदास काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नारायणा कोचिंग केंद्राच्या पुणे, चिंचवड शाखेचे संचालक शंकर सिंह राठोड, व्यवस्थापक संजय कुमार, शैक्षणिक विभाग प्रमुख परिणीता सुधांशू, प्रा. भगवान बक्श पटेल, श्याम गोरे, संजिवनी पाटील, व्याख्याते बालाजी जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘एनसॅट २३’ परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम दोन सत्रात झाला. सकाळच्या सत्रात तज्ज्ञांनी विविध विषयांवर विद्यार्थी – पालकांना मार्गदर्शन केले.
समाजातील विविध घटकांमधील विद्यार्थ्यांना ‘एनसॅट – २०२३’ परीक्षेत सहभागी होता यावे हा उद्देश समोर ठेवून नारायणा इन्स्टिट्यूटने ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घेतली. देशभरातून सुमारे अडीच लाख तर पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून साडेचार हजार विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फी सवलती व्दारे शिष्यवृत्ती दिली जाते. जेईई, नीट,आयआयटी अशा उच्च शैक्षणिक पात्रता परीक्षांमध्ये नारायणा कोचिंगच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे, असे शंभर सिंह राठोड यांनी यावेळी सांगितले.
देशातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा (आयआयटी – जेईई आणि नीट) साठी नारायणा इन्स्टिट्यूट सर्वोच्च संस्था आहे. विद्यार्थी पालकांमध्ये उच्च शैक्षणिक संधी, योजना यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी संस्था कार्य करत आहे. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश घेता येईल.
शै क्षणिक वर्ष २०२४ साठी नवीन प्रवेश सुरु झाले असून एप्रिल २४ पासून नवीन बॅचेसला प्रारंभ होणार असून ३१ डिसेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली.
तळेगाव केंद्रात प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा संजय कुमार – 9522200750, धनंजय पांडव – 9522200732,
श्याम गोरे – 9522200797 असे आवाहन संजय कुमार यांनी केले आहे. कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार शिवानी राजपूत यांनी मानले.