शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या विभागस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. शुभम अरुण गोंडे या विद्यार्थी खेळाडूंनी अथलेटिक्स क्रीडा प्रकारात लांब उडी, तिहेरी उडी व 400 मीटर हर्डल्स या तिहेरी क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
तसेच कु. निर्मल गिरी या विद्यार्थी खेळाडूंनी भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर मुलींमध्ये कु.वैष्णवी सचिन शिंगोटे हिने भाला फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच 4×100 मीटर रिले या क्रीडा प्रकारात कु. गणेश पवार ,कु.अरिंदम नितळीकर कु. सनी सुतार कु.शुभम गोंडे कु.निर्मल गिरी या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला या सर्व खेळाडूंची 29 ते 02नोव्हेंबर 2023 या कालावधीत चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली सर्व खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व ॲथलेटिक्स कोच श्री.गणेश गोंडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभाग स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.