शबनम न्युज | नवी सांगवी
नवी सांगवी मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यांची कामे झाली. मात्र, अंतर्गत रस्त्यांची कामे रखडलेली होती. यामुळे समता नगर गल्ली नो.१ नवी सांगवी येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने मेघराज दादा लोखंडे जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा ) व प्रियाताई देशमुख वरिष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिं-चिं शहर (जिल्हा) यांच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
स्थापत्य विभाग ( ह ) क्षेत्रीय कार्यालय मध्ये निवेदन देत उखटलेले पी.वि.सी ब्लॉक व अंतर्गत सीमेंट रोड चे खड्डे भरून कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली होती. याची दखल घेत अंतर्गत रस्त्याची कामे सुरूकेली आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले कारण नवी सांगवी मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कामे रखडलेल्या अवस्थेत होती, तसेच स्वामी विवेकानंद नगर नवी सांगवी मध्ये उखटलेले पी.वि.सी ब्लॉक व सीमेंट रोड चे खड्डे नीट करावे, अशी मागणी मेघराज दादा लोखंडे व प्रियाताई देशमुख यांनी केली.
या वेळी गौतम सेन,ओमकार काशीद , सुनीता ऐकाड, संगीत भोसले, जागृती लोखंडे, आशिष खत्री,पुष्कर कदम, प्रिया गायकवाड , यशाश नितेश, सागर लोखंडे, माणिक कांबळे, यश ढोर व प्रेम पाटील उपस्थिती होते.