( rehaan husen)
शबनम न्यूज | चित्रपट विशेष :
इतिहासाची कोणतीही मोडतोड न करता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना अतिशय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न झालेला मनोरंजक चित्रपट म्हणजेच सत्यशोधक, संदीप कुलकर्णी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. संदीप कुलकर्णी यांच्या जीवनातील अतिशय प्रभावी पणे साकारलेली भूमिका म्हणजेच सत्यशोधक चित्रपटातील महात्मा ज्योतिबा फुले
सत्यशोधक मराठी सिनेमा हा तात्कालीन ब्राह्मण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाज सुधारक कार्याची माहिती उत्तम प्रकारे प्रेक्षकांना मिळते. सावित्रीबाई फुले यांची भूमिका राजश्री देशपांडे या अभिनेत्रीने उत्तम प्रकारे साकारली आहे. तर गणेश यादव, रवींद्र मंकणी, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके ,अनिकेत केळकर यांनीही आपापल्या वाट्याला आलेली भूमिका योग्य प्रकारे साकारली आहे.
समता फिल्म निर्मित ,अभिता प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत ,सत्यशोधक या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर असून निर्माते प्रवीण तायडे ,अप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर ,सुनील शेळके, विशाल वाहुरवाघ आहेत. चित्रपटायचे चे पार्श्व् संगीत उत्तम आहे त्या मुळे प्रत्येक सीन हा प्रभावी झाला आहे.
. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना या चित्रपटात योग्य रीतीने मांडण्यात आल्या आहे. आपण ज्योतिबा फुले यांना महात्मा का म्हणावे याचे उत्तर या सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्ताने मिळते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी अनेक अडचणींचा सामना केला याचेच उत्तम प्रकारे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना या चित्रपटात प्रभावीपणे पटकथे च्या स्वरूपात दाखविण्यात आल्या आहेत प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट एकदा तरी पाहावा असे हा चित्रपट पहिल्या नंतर वाटते