शबनम न्युज | पुणे
रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स सेल यांच्या पुढाकाराने तसेच रॅशनल थिंकिंग सेल आणि इतिहास विभागातर्फे कॅस्टल-मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार 9 डिसेंबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता पार पडला.
याप्रसंगी सेवा सहयोग फाउंडेशनचे मा.श्री. मिलिंद वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम इंग्रजी विभाग प्रमुख, डॉ. सविता पाटील, इतिहास विभाग प्रमुख राजेंद्र रासकर, राज्यशात्र विभाग प्रमुख रमेश रणदिवे यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
यावेळी बाबूजीराव घोलप माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सीमा भोसले, इंदिरा स्कूल औंध च्या महानंदा लावंड येथील रयत प्राथमिक शाळेचे जे एस धोत्रे, गोळविलकर प्राथमिक शाळेचे भीमराव चव्हाण तसेच सदस्य शोभा शिरधोनकर, प्रा.सायली गोसावी, प्रा. सौरभ कदम, प्रा. गौरव जाधव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी आदी उपस्थित होते.