धनगर समाजाच्या विविध मागण्यांच्या या अमरण उपोषणाला भाजप पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पाठिंबा
धनगर समाजाच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी समाजसेवक गणेश खरात व त्यांचे सहकाऱ्यांच्या वतीने 7 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू होते त्यांच्या या उपोषणाला पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पाठिंबा जाहीर केला तसेच धनगर समाजाच्या मागण्या आहेत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांच्या वतीने मिळाल्यानंतर सदरचे उपोषण उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले .
धनगर समाज बांधवांना समाजासाठी पाच ते दहा गुंठे जागा लवकरात लवकर महानगरपालिका मार्फत मिळवून देऊ अशी शंभर टक्के खात्री मिळाल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती गणेश खरात यांनी दिली.
सदरचे उपोषण भाजप पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन सोडण्यात आले. यावेळी अनेक समाज बांधव भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.