शबनम न्युज | पिंपरी
कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची दक्षता घेण्याची सूचना पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
शेखर काटे यांनी दिलेली निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनासारखा घातक आजार सध्या वाढत आहे. आपल्या देशातील केरळ राज्यात कोरोनाचे अनेक रुग्ण वाढले आहे, त्या अनुषंगाने आपल्या पिंपरी चिंचवड शहरात आहे याबाबत अत्यंत तातडीने उपाय योजना करण्यात यावी, तसेच सर्व वयोगटातील लहान मुले, मुली, तरुण, तरुणी ,महिला ,पुरुष, ज्येष्ठ नागरिक या सर्वांकरिता ही उपाययोजना करण्यात यावी ,अशी मागणी शेखर काटे यांनी मनपा आयुतांकडे केले आहे.