शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहर प्रमुख (युवासेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चेतन अण्णा पवार यांच्या वतीने पदाधिकारी मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मुलाखत कार्यक्रमासाठी नोंदणी कालावधी हा 22 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत राहणार आहे.
सदर मुलाखती साठी नाव नोंदणी करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf9PAJG0KM0adIgXsuDvNEUfzO10bI7oqlG3L0XJsuGQEMY2g/viewform या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन देखील यावेळी चेतन पवार यांनी केले आहे. तसेच आपण कोणत्या पदासाठी इच्छुक आहात हे देखील सदर अर्जात नोंद करण्यास सांगण्यात आले आहे. अर्जामध्ये आपली संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करायचा आहे.
तरी जास्तीत जास्त युवकांनी या पदाधिकारी मुलाखतीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन चेतन पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.