शबनम न्युज | पिंपरी
दि.26ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत शिरपूर,जि. धुळे येथे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील मुलांच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करताना नाशिक विभागाचा एकतर्फी पराभव करत प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद संपादन केले .
सदर राज्यस्तरीय स्पर्धेतून 17 वर्षाखालील महाराष्ट्र मुलांचा संघ निवडण्यात आला त्यात कु.चैतन्य शांताराम कोंडभर, कु.राजवर्धन श्रीकांत शितोळे , कु.प्रज्वल प्रकाश पवार कु.यश बर्गे या 04 खेळाडूंची पटना, बिहार येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार चैतन्य कोंडभर याने नाणेफेक जिंकून राजमाता जिजाऊ संघाने 20 ओव्हरमध्ये दोन बाद 225 धावांचे तगडे आव्हान नाशिक विभागाच्या संघाला देण्यात आले. त्यास प्रत्युत्तर देताना नाशिक विभागाचा संघ 14ओव्हरमध्ये सर्व बाद अवघ्या 94 धावांमध्ये संपुष्टात आला त्यामुळे 131 धावांनी एकतर्फी पराभूत करत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्यामध्ये आक्रमक फलंदाज यश बर्गे याने 59 चेंडू 126 धावा, चैतन्य कोंडभर याने 58 चेंडूत 81 धावा करत संघाची मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. राजवर्धन शितोळे या गोलंदाजाने 4 ओव्हर मध्ये 17 धावा देऊन 05 विकेट मिळवल्या तर प्रज्वल पवार या गोलंदाजाने 03 ओव्हर मध्ये 06 धावा देत 03 विकेट मिळवल्या तर चंद्रस भालघरे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 17 वर्षाखालील मुलांच्या संघात कु.अथर्व पवार, पियुष इंगवले, मिहिर कापसे, बाबासाहेब कसबे, चैतन्य पाटील,ऋषिकेश शिंदे, झैद अन्सारी, सौरभ दौंड, प्रज्वल पवार, राजवर्धन शितोळे,आयुष भापकर,ओंकार जाधव,चंद्रस बालघरे,चैतन्य कोंडभर, यश बर्गे , पारस चव्हाण या सर्व खेळाडूंचा समावेश होता.या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व दत्तात्रय वाळके यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राष्ट्रीयस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.