शबनम न्युज | औंध
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या रॅशनल थिंकिंग सेल(विवेकी विचार मंच) अंतर्गत विद्यार्थ्यांनी “द…द…दुधाचा” ३१ डिसेंबरला दारू नाही दूध प्या’ हा उपक्रम पंडित भीमसेन जोशी सभागृह चौक, येथे राबविण्यात आला.
या वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी “धूम्रपान मध्यपान आयुष्याची धूळधान “, “मादक द्रव्याची नशा अनमोल जीवनाची दुर्दशा”, अशा आशयाच्या घोषणा दिल्या व दूध वाटून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. तसेच विद्यार्थ्यांनी दारू आणि दूध यातील फायदे तोटे हे उपस्थित लोकांना समजावून सांगितले.
यावेळी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे(अंनिस) कार्यकर्ते मिलिंद देशमुख, श्रीपाद ललवाणी, संकेत मुनोत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपक्रमाच्या समन्वयक डॉ. सविता पाटील, डॉ. शोभा शिरढोणकर, प्रा. सायली गोसावी, प्रा. गौरव जाधव, प्रा. सौरभ कदम आणि रॅशनल थिंकिंग सेलचे सर्व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होते. तसेच चतूर्शृंगी पोलीस स्टेशन चे पोलीस इन्स्पेक्टर बालाजी पांढरे यांनी विद्यार्थ्याना दूध देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मद्यपान केल्याने मानवाच्या शरिराची कशी झीज होते व नववर्षाचे स्वागत मद्याशिवाय अन्य उपक्रमांद्वारे देखील करता येते ही गोष्ट उपस्थितांना पटवून दिली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे औंध गावातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.