शबनम न्युज | पिंपरी
वीज खंडित झाल्यामुळे उद्योजक त्रस्त भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक येथील महात्मा फुले नगर समोरील बाजूस असलेल्या औद्योगिक क्षेत्रात काल दुपारपासून लाईट वीज बंद झाल्यामुळे मंगळवार रोजी दुपारी तीन वाजल्यापासून अद्याप बंद आहेत. या ठिकाणी अंडरग्राउंड केबलचा कायम समस्या असून याबाबत महावितरण मुख्य अभियंता देवकर साहेब यांची आज इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर आणि उद्योजकांनी भेट घेऊन ही समस्या त्वरित निवारण करण्याची मागणी केली.
यावेळी देवकर साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून त्वरित समस्या निवारण करण्यासाठी आदेश दिले आणि चार तासात वीज समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले एमआयडीसी परिसरात अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर लांब असल्यामुळे तसेच विविध भागात जुन्या महावितरण केबल झालेले आहेत, बऱ्याच वेळेला थोड्या थोड्या अंतरावर अनेक केबल मध्ये नादुरुस्ती येत असते. त्यामुळे परिसरातील कंपन्यांना दोन दोन दिवस आपल्या कंपन्यांचे उत्पादन बंद ठेवावे लागते, त्यामुळे उद्योजक त्रस्त आहेत महावितरण ने याकडे त्वरित लक्ष घालण्याची मागणी श्री अभय भोर यांनी केली अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष अभय भोर उपाध्यक्ष वैभव जगताप तसेच अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.