शबनम न्यूज , प्रतिनिधी :
अजमेर येथील दर्गा हजरत खाजा गरीब नवाज सरकारच्या 812 व्या उर्स निमित्त राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वतीने चादर पेश करण्यात आली आहे.
अजमेर शरीफ येथे हजरत खाजा गरीब नवाज यांचा उर्स मोठ्या उत्साहात दरवर्षी संपन्न होत असतो यावेळी संपूर्ण देशातील नागरिक अजमेर येथे दर्शनासाठी जात असतात.
Advertisement
शरद पवार यांच्या वतीने ही खाजा गरीब नवाज यांच्या दर्गा करिता चादर पेश करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे , युवा नेते प्रशांत कापसे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, उद्योजक सोफियान सिद्दिकी ,आरिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.