शबनम न्यूज | पिंपरी
अभय भोर अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन भोसरी एमआयडीसी परिसरात बावीस ब्लॉक असून अंतर्गत रस्ते 76 किलोमीटर आहेत परंतु अंतर्गत भागात गेले 50 वर्षात कर्मचारी वर्गाला जाण्या येण्यासाठी फक्त मुख्य रस्त्यावरून बस वाहतूक आहे. या अंतर्गत भागात बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे तसेच शहरात मेट्रो आली असून त्याचा उपयोग कोणत्याही एमआयडीसी मधील कर्मचाऱ्यांना होत नाही एमआयडीसी भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत जाण्यासाठी कोणतेही सुविधा नसल्यामुळे लोकांना मेट्रोचा लाभ घेता येत नाही अनेक कामगारांचे कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे आणि बाहेरील भागातून येणाऱ्या नागरिकांचे खूप हाल होत असतात, तसेच परिसरात डी वाय पाटील सारखे कॉलेज असून हजारो विद्यार्थिनी रस्त्यावरून चालत जात असतात एकदा महानगरपालिकेकडे देखील मागणी केली पीएमपीएल कडे मागणी केली परंतु अद्याप त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही पुढील काळामध्ये एमआयडीसीमध्ये बस सेवा सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज दिला.